पुणे – पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न

भावासोबत पुर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सराईत चेतन चव्हाण (वय.23) याला अटक केली आहे. अशवेक महेंद्र ननावरे (वय.23,रा.मासेआळी उत्तमनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ही घटना तीन दिवसापुर्वी रात्री 9 च्या सुमारास येथील मासेआळी समोरील बोळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन चव्हाण याचा फिर्यादी अशवेक ननावरे याच्या भावासोबत पुर्वी वाद झाला होता. तीन दिवसांपुर्वी अशवेक रस्त्याने पायी चालत निघाले असताना चव्हाण व त्याच्या इतर दोन साथीदारांनी शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण केली. तसेच परिसरात मोठ्या आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोकडे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या