तरूणाला मारहाण फरारी झालेल्या भावडांना अटक, वाहनचोरी विरोधी पथकाची

तरूणाला मारहाण करून गंभीर दुखापत करीत फरार झालेल्या दोघा भावडांना वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यातंर्गत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे. रहेमान चाँद शेख (वय 29 रा. कोंढवा) आणि हानिफ चाँद शेख (वय 30 रा. नवाजी चौक, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वाहनचोरी विरोधी पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी तरूणाला मारहाण करून गंभीर जखमी केलेले आरोपी दोन्ही सख्खे भाउ रास्ता पेठ परिसरात थांबल्याची माहिती पोलीस नाईक धनंजय ताजणे आणि पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना फरासखाना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटक्के, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, शाहिद शेख, पोलीस नाईक धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे आणि सुमित ताकपेरे यांनी केली.a

आपली प्रतिक्रिया द्या