
किरकोळ भांडणातून दोघा भावडांवर तलवारीने वार करून त्यांना फरशीने मारहाण करीत गंभिर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता शेवाळवाडी मार्केटमागे घडली आहे. विशाल गायकवाड आणि गणेश गायकवाड अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. समीर नरळे (वय 22, रा. कावळेवस्ती ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांविरोेधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींचे किरकाळे कारणांवरून विशाल गायकवाड यांच्यासोबत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास भांडण झाले होते. त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी शेवाळवाडी मार्केटच्या मागे कॅनॉलचे रस्त्यावर विशाल गायकवाड व त्याचा भाऊ गणेश यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने हल्ला केला तसेच लाथा-बुक्क्यांनी आणि फरशीने मारहाण केली. त्यामुळे डोके, पाठ व हातावर मारहाण झाल्याने गायकवाड भावंडे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजू अडागळे पुढील तपास करीत आहेत.
पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार
पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार केल्याची घटना हडपसरमधील काळेपडळ रस्त्यावर घडली. त्यामध्ये सौरभ चौतमहल (वय 20) जखमी झाला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.



























































