मारटकर हत्याप्रकरणी आणखी चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघ युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या हत्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी आणखी चाैघांना अटक केली. तर दोघा संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आल्याची माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. सनी कोलते, राहूल श्रीनिवास रागीर, रोहित क्षिरसागर व रोहित कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दीपक मारटकर यांची गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सपासप वार हत्या करण्यात आली. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यासह 8 जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी अश्‍विनी कांबळे, महेंद्र सराफ आणी निरंजण म्हंकाळे यांना अटक केली होती. त्यानंतर रविवारी चौघांना अटक करण्यात आली आहे.