पुणे – फसवणूकीच्या गुन्ह्यात फरारीला अटक

फसवणूकीच्या गुन्ह्यात मागील पाच वर्षांपासून फरार असलेल्याला आरोपीला खंडणी विरोधी पथक दोनने अटक केले. मुन्ना नियाज शेख (वय 43, रा. वानवडी बाजार, मूळ-उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड पथकासोबत हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी फसवणूकीच्या गुन्ह्यात मागील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी वानवडी परिसरात असल्याची माहिती हवालदार प्रदीप शितोळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मुन्ना शेख याला ताब्यात घेतले. त्याला विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या