
शहरात घरफोडीचे सत्र कायम असून चोरट्यांनी काल मध्यरात्री लुल्लानगरधील तीन सोसायट्यांमधील 8 बंद घरे फोडून 72 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. तर सहकारनगरधील तीन फ्लॅटमध्ये चोरी केली आहे.
लुल्लानगरमध्ये आरिस्टो क्रॅट सोसायटीतील अशोक भोई (वय 26) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 42 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्याशिवाय इमारतीतील तीन फ्लॅट फोडले आहेत. त्यानंतर सोना हौसिंग सोसायटीतील अमिनुद्दीन शेख यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून 25 हजारांची सोन्याची अंगठी चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी क्लासिको बंगलोमध्ये चोरी केली आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी सहकारनगरमधील चव्हाणनगरमध्ये तीन फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी राहूल सुतार यांनी फिर्याद दिली आहे.
”चोरट्यांनी तीन इमारतीतील 8 बंद घरांचे कुलूप तोडून चोरी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात आहे.” – प्रभाकर कापुरे, पोलीस उपनिरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे

























































