राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून खलिस्थान समर्थक अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी चाकण परिसरात वर्षभरापूर्वी खलिस्थान समर्थकाला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आले होते. त्याच्या चौकशीत आणखी एका खलिस्तानीचे नाव उघडकीस आले होते. संबंधीताला दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. तो सोशल मीडियावर शीख समुदायातील युवकांना जाळ्यात ओढत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गुरूजीतसिंग निज्जर (रा. पंडोरी सुखासिंग, अंजाला, अमृतसर, पंजाब) याला अटक करण्यात आली.

निज्जर खलिस्थान समर्थक आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो परदेशात पसार झाला होता. सोशल मीडियावर तो खलिस्थानची मागणी करणारे संदेश प्रसारित करत होता. त्याला पकडण्यासाठी लूक आऊट नोटीस बजावण्यात आली होती. मंगळवारी तो विमानाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरला होता. एनआयएच्या पथकाने त्याला अटक केली. पुण्यातील चाकण भागात खलिस्थान समर्थकाला वर्षभरापूर्वी अटक करण्यात आली होती. तेव्हा निज्जरचे नाव पुढे आले होते. निज्जरला मुंबईतील एनआयएच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली.