पुणे – कोंढव्यातील तरुणाच्या खुनप्रकरणी मुख्य आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या वादातून तरुणाच्या खूनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपींना खंडणी विरोधी पथक दोन कडुन अटक करण्यात आली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. अभिषेक दशरथ पवार (वय 19,रा. शिवनेरी नगर कोंढवा बुद्रुक) अजय नरसिंग गरड (वय 19, रा. येवलेवाडी, कोंढवा ), व विधी संघर्षित बालक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

टोळक्याने कार्तिक अनिल जाधव याचा 12 ऑगस्टला येवलेवाडीत डोक्‍यावर, हातावर, कानावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. खुन केल्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अभिषेक पवार व त्याचे साथीदार फरार झालेले होते.या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांना खबर मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी अभिषेक पवार व त्याचे साथीदार हे वाघोली चौक येथे येणार आहेत. त्यानूसार सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुके, संग्राम शिनगारे, महेश साळुके, प्रविण पडवळ, विजय गुरव, संपत औचरे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महीला पोलीस आशा कोळेकर, रुपाली कर्णवर, यांनी केली आहे