पुणे – चोरी करताना पकडल्याच्या रागातून अल्पवयाीने केला तरूणावर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधाराचा फायदा घेउन चोरी करताना पकडल्यानंतर नागरिकांनी अल्पवयीनाला मारहाण करून सोडून दिले होते. त्याचा राग मनामध्ये धरून अल्पवयीने पुन्हा माघारी येउन तरूणाच्या गुडघ्यावर कोयत्याने वार करून जखमी केले आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुंढव्यातील केशवनमध्ये घडली. याप्रकरणी रोहन पवार (वय 19) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी केशवनगर परिसरात लाईट गेल्यामुळे अल्पवयीनाने रोहन यांच्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रोहन यांनी त्याला पकडले असता, शेजारील लोकांनी अल्पवयीन चोरट्याला मारहाण करून सोडून दिले. त्यानंतर चोरटा तेथून निघून गेल्यानंतर पुन्हा रात्री त्याने माघारी येउन रोहन यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले तपास करीत आहेत.