जुन्या वादातून सराईताचा खून करणाऱ्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनीट तीनने अटक केली. निखील बाळू धोत्रे (वय 30) , सूरज संजय बोत्रे (वय 29, दोघेही रा. नवी पेठ) प्रवीण गणपत गाडे (वय 31) अमरदीप मुंकूंद भालेराव (वय 28, दोघेही रा. दांडेकर पूल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अक्षय किरतकिर्वे (वय 28, रा. दांडेकर पूल) असे खून केलेल्या सराईताचे नाव आहे .
आरोपी निखील धोत्रे आणि अक्षय किरतकिर्वे यांच्यात वाद होते. त्याच रागातून निखीलने साथीदारांच्या मदतीने अक्षयवर कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर आरोपी मुळशीतील देवकरवाडीत असल्याची माहिती पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी जुन्या वादातून सराईत अक्षय किरतकिर्वे याचा खून केल्याची कबुली दिली. खूनानंतर युनीट तीनने अवघ्या बारा तासांमध्ये आरोपींचा शोध घेतला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, राजेंद्र मारणे, संतोष क्षीरसागर, दीपक मते, महेश निंबाळकर, एकनाथ वंâधारे, दीपक क्षीरसागर, विल्सन डिसोझा, सोनम नेवसे यांनी केली.



























































