अमली पदार्थ बाळगणाऱ्या परदेशी नागरिकाला पकडले, साडेचार लाखांचे अमली पदार्थ जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडूनअमली पदार्थ, मोबाइल असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नसबुग इस्माइल (वय 23, सध्या रा. ओैंध, मूळ रा. युगांडा ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खडकी बाजार परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी एक परदेशी नागरिक अमली पदार्थ विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानूसार सापळा रचून इस्माइल याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 32 ग्रॅम मेफेड्रोन, 16 ग्रॅम मेथेक्युलॉन असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.