वेळ विचारण्याच्या बहाण्याने हिसकाविला मोबाइल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पादचाऱ्याला वेळ विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वार चोरट्यांनी  एकाचा  तीन हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. तरूणाने प्रतिकार केला असता, चोरट्यांनी त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 20 जुलैला रात्री दहाच्या सुमारास लोहियानगरमध्ये घडली.

याप्रकरणी साहिल उर्फ राधे (20) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्याविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरिद  शेख (वय 42 रा. लोहियानगर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिद हे 20 जुलैला रात्री दहाच्या सुमारास लोहियानगर परिसरातून पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या साहिल आणि अल्पवयीन साथीदाराने त्यांना वेळ विचारण्याचा बहाणा केला. आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून फरिद यांच्या हातातील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केला असता, चोरट्यांनी त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक सुरज कुतवळ करीत आहेत.