पुणे – रवींद्र बऱ्हाटेच्या घरात पोलिसांना सापडले दस्ताऐवजांचे घबाड

crime

बेकायदा सावकारी प्रकरणांत मोक्कानुसार कारवाई केलेला फरार आरोपी रवींद्र बऱ्हाटे याच्या घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दस्ताऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईतील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कागदपत्रांचा समावेश आहे.

बांधकाम व्यवसायिकाला धमकावून खंडणी उकल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि साथीदारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर तो पसार झाल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी काल बऱ्हाटेच्या लुल्लानगर तसेच धनकवडीतील तळजाई पठार परिसरातील घर, मुलीच्या सासऱ्याचे घर, बऱ्हाटेच्या बहिणीच्या घरात छापा टाकून महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये त्याने माहिती अधिकारातंर्गत प्राप्त पुणे व मुंंबईतील नामांकित बांधकाम व्यवसायिक, शासकीय ठेकेदारांच्या संबंधित अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे.

सरकारी कार्यालयापेक्षाही जास्त कागदपत्रे जप्त

पोलिसांनी बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाईकाच्या घरात मोेठ्या प्रमाणात दस्ताऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महसूल विभाग, पीएमआरडी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आयकर विभाग, जिल्हा परिषद, विविध ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयास केलेले पत्रव्यवहार, संबंधित माहितीचे दस्ताऐवज, राजयकी व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे, कुलमुखत्यारपत्रे, खरेदीखत, करारनामे, भागीदारीपत्रे, इतर दस्ताऐवजांसह कागदपत्रे पोलिसांनाी जप्त केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या