
कोथरूडमधील आशिष गार्डन परिसरातील किराणा माल दुकानासह चिकन विक्रीच्या दरवाजा उचकटून चोरट्यांनी 20 हजारांची रोकड चोरून नेले. याप्रकरणी मनोहरलाल जगदीशप्रसाद गौड (वय 52) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गौड यांचे आशिष गार्डन परिसरात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून त्यांच्या दुकानाचा गल्ल्यातील 15 हजारांची रोकड चोरुन नेल. त्यांच्याशेजारी असलेल्या अकबर शेख यांच्या बारामती अॅग्रो या दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील 5 हजारांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.





























































