
संशयामुळे तरूणासह महिलेला गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेउन जात असताना तरूणाने पोलीस अमंलदाराच्या हाताचा चावा घेउन जखमी केले. त्याशिवाय महिला आरोपीने वॉर्डनला मारहाण केल्याची घटना काल सकाळी अकराच्या सुमारास वाघोलीत घडली. याप्रकरणी उद्धव एकनाथ भोसले (वय 35, रा. आव्हाळवाडी ) याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अमंलदार सचिन पवार यांनी तक्रार दिली आहे.
पोलीस अमंलदार सचिन पवार हे संशयित आरोपी उद्धवकडे असलेल्या दुचाकीबाबत माहिती घेण्यासाठी त्याच्यासह एका महिलेला घेउन गुन्हे शाखेच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्याशिवाय उद्धव याने सचिन यांच्या हाताचा चावा घेउन जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एल. खोसे तपास करीत आहेत.



























































