मोबाईल चोरणाऱ्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल चोरणाऱ्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 5 मोबाईल आणि लॅपटॉप, असा 1 लाख 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

भारती विद्यापीठ पोलीस तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, सचिन गाडे, निलेश ढमढेरे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पथकाने हाफिज रिजवान शेख, ऊर्फे सुलतान (21, रा. कोंढवा मिठानगर) याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमध्ये लॅपटॉप, 5 मोबाईल फोनसह मिळून आल्याने पथकाने अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , एसीपी विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, सचिन गाडे, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, अशिष गायकवाड, मंगेश पवार, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.