अंगणात कचरा टाकण्यावरुन झाला वाद, तरुणावर कोयत्याने वार

crime

अंगणात कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादातून तिघांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उत्तमनगरधील वाल्मिकी मंदिराशेजारी घडली.

नीरज उर्फ गुण्या सुरज हिनोटिया (वय 18), ऑगस्टीन अरुणराज अ‍ॅन्थोनी (वय 22), नीलेश अ‍ॅन्थोनी (वय 27) अशी अटक केलेल्यांची नाहे आहेत. याप्रकरणी सोमनाथ मेहतो (वय 37 यांनी उत्तमनगर ) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोमनाथ त्यांच्या चुलत्याच्या घरासमोरील अंगणात साफसफाई करीत होते. त्यावरुन अंगणात कचरा टाकण्याच्या कारणामुळे नीरज उर्फ गुण्या याच्यासोबत सोमनाथची वादावादी झाली. त्या रागातून तिघांनी मिळून सोमनाथाच्या हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. आर डेरे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या