अमेरिकन डॉलरच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या दोन बांग्लादेशींना अटक

अमेरिकन डॉलर देतो म्हणून नागरिकांना गंडा घालणाNया दोन बांग्लादेशींना गुन्हे शाखेने अटक केले ओह. त्यांनी केलेले दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश आले आहे. पाखीबेगम अब्दुलमजीद खान (वय 32, ), महंमदशोएब अब्दुलमजीद खान (वय 27, रा. रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बांग्लादेशी टोळीने दत्तवाडी परिसरातील एका रिक्षा चालकासोबत ओळख करून मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर देतो, असे सांगून चालकाला एक लाख रुपयांचा गंडा घातला होता. गुन्ह्याचा तपास युनिट तीनकडून सुरू होता. त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी हे हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता काळे यांच्या पथकाने सापळा महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विश्रांतवाडी परिसरात एका व्यक्तीला ४ लाख रुपयांचा गंडा घातल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी हे मूळचे बांग्लादेशी असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

सावज हेरण्यासाठी रिक्षा प्रवास

टोळीतील एक आरोपी रिक्षाने प्रवास करीत चालकासोबत गप्पा मारत त्यांना अमेरिकन डॉलर सापडले आहेत, अशी बतावणी करीत होता. त्यांना संबंधित डॉलर चलनात आणायची माहित नाही असे सांगत संबंधिताला 20 अमेरिकन डॉलर देऊन चलनात आणण्यासाठी घेऊन जात. त्याचे पैसे मिळाल्यानंतर पाचशे रुपये घेऊन डॉलर घेण्यासाठी बोलविले जाई. त्याठिकाणी डॉलर ऐवजी कागदी बंडल देऊन फसविले जात होते.

आपली प्रतिक्रिया द्या