पत्नीवर चाकूने वार करून केला खून, भेकराईनगर परिसरातील घटना

crime

पत्नी सासरी राहण्यासाठी येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भेकराईनगरमधील शिवशक्तीनगर चौकात घडली.

शुभांगी सागर लोखंडे (वय 21, भेकराईनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सागर बाळू लोखंडे (वय 23,रा. उरळी देवाची,मुळ विजयवाडी अकलुज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेणूका राजू हनवते (वय 37,रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सागर व्यसनी असून त्याला दारू आणि गांजाचे व्यसन आहे. व्यसनाला कंटाळून शुभांगी त्याच्यासोबत राहत नव्हती. ती भेकराईनगरमध्ये आई-वडीलांकडे राहण्यासाठी गेली होती. पत्नी राहत नाही याचा सागरला राग होता. त्यातुनच त्याने आज सकाळी साडेनऊच्या सुमारास शुभांगीवर भररस्त्यात चाकूने वार केले. उपचारासाठी शुभांगीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी हडपसर पोलिस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या