सोशल मीडियावरून आत्महत्येचा मॅसेज, पोलिसांनी वाचवले युवकाचे प्राण

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियावरून आत्महत्येचे मॅसेज टाकणाऱ्या युवकापर्यंत पोचून त्याचे प्राण वाचवण्याची कामगिरी सायबर पोलिसांनी केली आहे. पुणे येथे राहणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाच्या मनात आत्महत्या करून जीवन संपवून टाकण्याचा विचार होता.मला आयुष्य संपवायचंय, असा मॅसेज त्याने सोशल मीडियावर टाकला.

आत्महत्येची मॅसेजची खबर महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला लागली. त्यानंतर सायबर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवली. त्या युवकाचे सोशल मीडिया अकाऊंट सायबर सेलने स्कॅन केले आणि त्याचे लोकेशन ट्रक केली. लोकेशन हडपसर येथील हेते. त्याची माहिती सायबर सेलने गुन्हे शाखेला आणि स्थानिक पोलिसांना दिली. पुढच्या अर्ध्या तासात पुणे पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी युवकाला टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त केले. युवक मूळचा धाराशीव येथील असून विवाहित आहे. पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या