
उसने घेतलेले पैसे वेळेत परत न दिल्याचा राग आल्यामुळे एकाने तरूणावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 25 जूनला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्यातील वैदवाडी रेल्वेपटरीजवळ घडली. अकिल सय्यद असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साबिर रशिद सय्यद (वय 35, रा. वैदवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपी अकिल आणि साबिर एकाच कुटूंबातील आहेत. काही दिवसांपुर्वी अकिलने साबिरला उसने पैसे दिले होते. त्यातील 40 हजार रूपये साबिरने दिले नव्हते. त्याचा राग आल्यामुळे अकिलने साबिरला पैसे लवकर पाहिजे, असे म्हणत त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड तपास करीत आहेत.





























































