Fact Check – लिफ्टमधील महिलेला मारहाणीचा तो व्हिडीओ स्क्रिप्टेड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात एक महिलेला एका तरुणाचा लिफ्टमध्ये जाताना धक्का लागतो. आणि दोघांमध्ये हाणामाही होते असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जरी खरा असला तरी यातली हाणामारी खरी नाही. हा संपूर्ण व्हिडीओ स्क्रिप्टेड म्हणजेच ठरवून केलेला आहे.

इन्स्टाग्रामवर Vipin_chauhan28 नावाचे अकाऊंट आहे. विपीन हा कुस्तीपटू आणि क्रिकेटर असल्याचे त्याच्या बायोमध्ये म्हटले आहे. विपीनने अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर टाकले आहेत. दोन दिवसांपूर्वी विपीनने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. परंतु अनेक ठिकाणी हा व्हिडीओ अर्धवट पोस्ट झाला आहे. विपीनच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट झाला असून कॅप्शनमध्ये प्लान म्हणजेच ठरवून केलेला हा व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vipin Chauhan (@vipin_chauhan28)