
पुणे शहरातील फुरसुंगी परिसरात असलेल्या मातोश्री रेवमा मुलींच्या खुल्या निवारागृहातून पाच अल्पवयीन मुलींना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना 29 ऑगस्टला घडली आहे. याप्रकरणी निवारा अधिक्षक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फुरसुंगी परिसरात मातोश्री रेवमा मुलींचा निवारागृह आहे. त्याठिकाणी अल्पवयीन मुलींना राहण्यासह शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. 29 ते 30 ऑगस्टदरम्यान पाच अल्पवयीन मुलींना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे तपास करीत आहेत.



























































