तरुण मुलांच्या मारहाणीच्या घटना तुम्ही आजवर अनेक पाहिल्या असतील. मात्र आता तरूणींच्या फ्री स्टाईल मारहाणीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे फ्री स्टाईल मारहाणीत मुलीही मागे नसल्याचे दिसून येत आहे.
तरूणी-तरूणींमध्ये झालेल्या फ्री स्टाईल मारहाणीची घटना डेक्कन नदीपात्रात घडली आहे. राग अनावर झालेल्या एका तरूणीने मारहाणीत थेट दांडक्याने विरोधी गटातील तरूणीवर हल्ला केला. त्यानंतर तरूणीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. डेक्कन परिसरातील नदी पात्रातील रस्त्यावर भर दुपारी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांना या भांडणाबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तरूणींमध्ये कशामुळे भांडण होऊन हाणामारी झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

























































