पदवीधर निवडणूकीसाठी मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

pune-police

शिक्षक व पदवीधर द्विवार्षिक निवडणुकीचे मतदान मंगळवारी (1 डिसेंबर) होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.

मतदानासाठी पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत 49 इमारतीत 152 मतदान केंद्रे आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात सोमवारी रात्री 12 वाजल्यानंतर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

मतदान केंद्राच्या परिसरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून अन्य दुकाने, उपहारगृहे, टपरी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षक, पदवीधर मतदार निवडणुकीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींना 29 नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजेपासून 1 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याशिवाय मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या