पुणे – ‘हॉटेल प्यासा’ मध्ये सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त, रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री केल्याप्रकरणी कारवाई

alcohol-new-study-report

पुणे शहरातील मध्यवर्ती असलेल्या ‘प्यासा’हॉटेलमध्ये काल रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरू असल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. मनोज शेट्टी याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी तक्रार दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 नंतर हॉटेल बंद करण्याचे निर्बंध आहेत. मात्र असे असतानाही काल रात्री उशिरापर्यंत हॉटेल प्यासा मध्ये मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने हॉटेलवर छापा टाकून सव्वा लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. बार व्यतिरिक्त रोडलगत वेगळे काउंटर उभा करून विनापरवाना मद्यविक्री आणि अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याचे दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या