पुणे – पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली.

साईनाथ उभे, अभिषेक उर्फ अभि पिंजण आणि सायको रा. धायरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केतन संजय जागडे (वय -21, रा. जाधवनगर धायरी असे जखमी झालेल्या तरुनाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून पाणी आणायला चालले होते. त्यावेळी पूर्वीच्या भांडणामुळे  साईनाथ आणि इतर साथीदारांनी त्याला अडविले. त्यांनी केतनला शिवीगाळ करून कोयत्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस तपास करीत आहेत.