कोपरगावात सशस्त्र दरोडा; पिस्तुलाचा धाक दाखवून 70 हजारांची रोकड लुटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकातील दिवंगत आमदार रमेश मोरे व्यापारी संकुलनात पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमारीची घटना घडली आहे. ही घटना कोठारी एजन्सी गाळा नंबर 4 व 5 या दुकानात रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. चार ते पाच अज्ञात इसमांनी व्यापारी प्रवीण शोभाचंद कोठारी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून 70 हजार रुपयांची रोकड लुटून नेली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशी कोठारी यांची कोलगेट व बिस्कीट चॉकलेट व इतर वस्तूंची विक्री झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ते संध्याकाळी दिवसभरचा धंदा उरकुन जमा झालेली रक्कम मोजत होते. त्याच वेळी दोन मोटर सायकल वरून चार ते पाच इसम आले. 3 जण बाहेर थांबले व दोन जण मागे गेले. त्यातील एकाने बोलणाऱ्याच्या कानाला लावला त्याचा राग दाखवला कोठारी ही काचेच्या केबिनमध्ये बसले होते. त्यांनी बाहेर काय गडबड चालली म्हणून पाहिले असता त्यांनाही धाक दाखवला त्यांच्याशी झटापट झाली. त्यातील एका इसमाने कोयत्याचा काचेवर वार केला, मात्र काच जाड असल्याने ती तुटू शकली नाही. त्यानंतर ते इसम मोटर सायकलवरून पळून गेले. ही घटना त्यांनी पोलिसांना कळवली ते घटना कळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी फौजफाट्यासह भेट दिली असून तपासाची चक्रे फिरवली आहे. त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही आहे. त्यात फुटेज आले आहे. मात्र यामध्ये हे चोरटे अस्पष्ट दिसत आहे. दरम्यान सोमवारी सदर चोरट्यांनी रेकी केल्याची चर्चा सुरू होती. सायंकाळच्या वेळी झालेल्या जबरी चोरीमुळे कोपरगावची वाटचाल बिहारच्या दिशेने चालली आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.