कोथरूडमध्ये बांधकाम व्यवसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

1524

कोथरूडमध्ये एका बांधकाम व्यवसायिकाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी कोथरूड पोलिसांनी धाव घेतली असून, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर (वय 55, रा. मुक्ताई को-सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील आशिष गार्डन परिसरात रामचंद्र हे मुक्ताई कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहण्यास होते. ते पत्नी, मुलासह राहत होते. सोलापूर येथे त्यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांना डायबेटीसचा त्रास होता. आज दुपारी त्यांनी इमारतीच्या टेरेसवर जाऊन त्यांनी खाली उडी मारून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे, कोथरूड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या