बिबट्याचा 80 वर्षांच्या वृद्धावर हल्ला

456
leopard

गणेशनगर वस्तीवर गुरुवारी पहाटे 3.30 वाजता बबन कोंडाजी पिंगळे या 80 वर्षाच्या वृद्धावर बिबट्याने झोपेतच हल्ला केला. घराजवळ येऊन हल्ला झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

नारोडी परीसरातील गेल्या चार दिवसात तीन शेळ्यावर हल्ले झाले आहे. या भागात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद होत नाही. त्यामुळे वनखात्या बाबत ग्रामस्थांचा रोष वाढला आहे.बबन पिंगळे हे रोजच्याप्रमाणे घरासमोरील ओट्यावर कॉटवर झोपले होते .पहाटे साडेतीन वाजता बिबट्या जवळ येऊन त्यांचे डोके जबड्यात पकडले. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर बिबट्या पसार झाला. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रताप चिंचोलीकर यांनी उपचार केले. दरम्यान गेल्या चार दिवसात नवनाथ गवळी यांच्या दोन व सुरेश कदम यांच्या एका शेळी वर हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या