पुणे – लोहियानगरमध्ये भीषण आग

fire-pic

लोहियानगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासमोर झोपडपट्टी परिसरात रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.

लोहियानगर झोपडपट्टीत रात्री साडेनऊच्या सुमारास बैठ्या घरात आग लागली होती. या भागात दाटीवाटीने बैठी घरे असल्यामुळे आग लागल्यानंतर शेजारील घरांना आगीची झळ पोहोचली. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासमोर असलेल्या छोट्या गल्लीत आग लागल्यानंतर त्वरीत 8 बंब घटनास्थळी रवाना करण्यात झाले. छोट्या गल्लीत बंब पोहचू शकत नसल्याने मदतकार्यात अडथळे आले. त्यामुळे पाईप एकमेकांना जोडून पाण्याचा मारा करण्यात आला. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, शिवाजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. आग लागल्यानंतर या भागात घबराट उडाली आहे. या परिसरातील रहिवाशी मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या