बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू, मगरपट्टा परिसरातील घटना

file photo

इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करत असताना 13व्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. राजीव ठाकूर (रा. पांजरा, जिल्हा रायसोनी, मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मगरपट्टा एका बांधकाम साईटवर घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजीव ठाकूर मगर पट्ट्यातील एका बांधकाम साईटवर साथीदारासोबत 13व्या मजल्यावर काम करत होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास तो इमारतीवरून खाली पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या