पुणे – घरकाम करणाऱ्या महिलेने चोरले 2 लाख रूपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीने  मालकाची नजर चुकवून घरातील कपाटातील 2 लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना सॅलसबरी पार्कमधील सुयोग पुष्प सोसायटीत घडली. याप्रकरणी राजेंद्र मुथ्था (वय 58, रा. सॅलसबरी पार्क)  यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिनीनुसार, फिर्यादी राजेंद्र कुटुंबीयांसह सॅलसबरी पार्कमधील सुयोग पुष्प सोसायटीत राहायला आहेत. त्यांचे घरकाम करण्यासाठी एक मोलकरणीन होती. 1 ते 3 डिसेंबर कालावधीत तिने राजेंद्र यांची नजर चुकवून घरातील कपाटातील रोख 2 लाखांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. त्र्यंबके तपास करीत आहेत.