
पुण्यातील मेट्रो आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 1 तास लवकर सुरू करीत आहे. संबंधित बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी 7 ते रात्री 10 अशीच सुरू असणार आहे. हे बदल 17 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात येणार आहेत.
पुणे मेट्रोच्या फेऱ्या पुढीलप्रमाणे असतील
वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
सकाळी 6 ते 8 – दर 15 मिनिटांनी
सकाळी 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग
सकाळी 7 ते 8 – दर 15 मिनिटांनी
सकाळी 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी


























































