पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार

300
प्रातिनिधिक फोटो

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. यात तीन जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. गणेश सुखदेव दराडे (29) श्रीकांत बबन आव्हाड (28) अजय श्रीधर पेदाम (27) अशी मृतांची नावे आहेत.

गणेश रा. कर्हे, श्रीकांत रा. दरेवाडी हे दोघे संगमनेर तालुक्यातील असुन अजय हा रा. पांजरे, ता. चंद्रपूर येथील आहे. पुणे नाशिक महामार्गावरील नांदुर-शिंगोटे वरून संगमनेरच्या दिशेने कारमधून जात होते. त्याचवेळी कर्हे घाटात पुढे चाललेल्या ट्रकला कार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिनही युवकांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस हवलदार रफिक पठाण, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील तिघा युवकांना बाहेर काढलं. या भीषण अपघातामुळे पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री बऱ्याचवेळ विस्कळीत झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या