Pune News – नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच, कंटनेरची तीन ते चार वाहनांना धडक

गेल्या आठवड्यात नवले पुलावर घडलेली अपघाताची ताजी असतानाच सोमवारी पुन्हा अपघात घडला. नवले पुलावरील तीव्र उतारावर सोमवारी दुपारी कंटनेरने तीन ते चार वाहनांना धडक दिली. आठवडाभरात घडलेल्या दुसऱ्या घटनेने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नवले पुलावर गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली होती. यात आठ जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर नवले पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यानंतर सोमवारपासून पुन्हा धीम्या गतीने वाहतूक सुरू करण्यात आली. वाहनांना 30 च्या स्पीडने गाडी चालवणे बंधनकारक करण्यात आले होते. वाहतूक सुरू होताच पहिल्याच दिवशी पुन्हा अपघाताची घटना घडली.