सांगली जिल्ह्यातील 41 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

सांगली जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या 41 अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हा आदेश जारी केला.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांची प्रतीक्षा लागून राहिली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे व वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, नियंत्रण कक्षाचे सहायक निरीक्षक सुहास ठोंबरे यांना एक वर्ष मुदतवाढ दिली. पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील (कवठेमहांकाळ ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष), संजय हारूगडे (इस्लामपूर ते सायबर ठाणे), किरण रासकर (मिरज शहर ते आर्थिक गुन्हे शाखा), प्रवीणकुमार कांबळे (नियंत्रण कक्ष ते कवठेमहांकाळ), किरण चौगले (सांगली ग्रामीण ते मिरज शहर), संजय मोरे (सांगली शहर ते जिल्हा विशेष शाखा), भैरू तळेकर (जिल्हा विशेष शाखा ते सांगली ग्रामीण), प्रदीप सूर्यवंशी (वाचक एक ते नियंत्रण कक्ष), सिद्धेश्वर जंगम (शिराळा ते पलूस), संदीप पाटील (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष ते आष्टा), जंबाजी भोसले (नियंत्रण कक्ष ते शिराळा), बयाजीराव कुरळे (नियंत्रण कक्ष ते आवेदन शाखा), सतीश कदम (आवेदन शाखा ते संजयनगर), महेंद्र दोरकर (आर्थिक गुन्हे शाखा ते नियंत्रण कक्ष), सहायक निरीक्षक प्रवीण घाडगे (आर्थिक गुन्हे शाका ते न्यायालयीन कक्ष), दिनेश काशिद (वाचक शाखा दोन ते वाचक एक), गणेश कोकाटे (आरसीपी ते कडेगाव), सुशांत पाटील (पलूस ते वाचक शाखा 2), दिपक भांडवलकर (कुपवाड ते आर्थिक गुन्हे शाखा), सागर वरूटे (इस्लामपूर ते शिराळा), पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार (सांगली शहर ते स्थानिक गुन्हे अन्वेषण), अविनाश घोरपडे (तासगाव ते वाचक शहर विभाग), सपना अडसूळ (मिरज शहर ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध), विश्वजीत गाडवे (कुपवाड ते पलूस), महेश गायकवाड (नियंत्रण कक्ष ते आरसीपी 1) यांची प्रशासकीय बदली झाली.

विनंतीनुसार बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ (तासगाव ते ईश्वरपूर), अरुण सुगावकर (नियंत्रण कक्ष ते सांगली शहर), संग्राम शेवाळे (कडेगाव ते तासगाव), सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे (सांगली ग्रामीण ते कुपवाड), राजेंद्र यादव (वाहतूक शाखा तासगाव ते विटा), उपनिरीक्षक मृणालिनी पाटील (वाचक शहर ते नियंत्रण कक्ष), संजीव जाधव (उमदी ते कोकरूड), अमोल थोरात (आटपाडी ते एमआयडीसी), अकीब काझी (जिल्हा विशेष शाखा ते वाहतूक शाखा तासगाव), विनायक मसाळे (कवठेमहांकाळ ते मिरज शहर), सिद्धेश्वर गायकवाड (कासेगाव ते उमदी), महेश करचे (तासगाव ते मिरज वाचक).