खडकवासला धरणात पाणी सोडल्याने 20 जण अडकले

नवरात्रानिमित्त रविवारी खडकवासला धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडल्यामुळे वाढलेल्या प्रवाहाचा सामना करावा लागला. 15 ते 20 नागरिक धरणातील खडकांवर अडकून पडले होते. याबाबतची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. रविवारी दुपारी अनेक नागरिक धरण परिसरात थांबले होते. अनेकजण किनाऱयावर कपडे धूत होते. मात्र, काहीजण आत खडकांवर उतरले होते. यादरम्यान 20 जण अडकून पडले.