बुधवारी पुण्यात ‘नो हॉर्न डे’, सचिन तेंडुलकरने दिल्या शुभेच्छा

745

पुण्यात बुधवारी ‘नो हॉर्न डे’ पाळला जाणार आहे. गाडी चालवताना हॉर्नचा उपयोग कमीतकमी आणि गरज असेल तेव्हाच करा हा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. पुण्यातील वाहतूक हास्य क्लबचे जेष्ठ नागरिक, आय टी प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि वाहतूक पोलीस या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

हा उपक्रम सकाळी साडे आठ वाजता पासून पुण्यातील तीस चौकांमध्ये उभं राहून लोकांमधे जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ३५ लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात ३७ लाख वाहनांची नोंद आहे. त्यामुळं विनाकारण हॉर्न वाजवल्यास निर्माण होणाऱ्या गोंगाटामुळं अनेकांना शारिरीक व्याधी आणि समस्यांना जडतायत. हे रोखण्यासाठी पाळण्यात येणार्या नो हॉर्न डे ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील शुभेच्छा दिल्यात आणि हॉर्नचा उपयोग कमीतकमी करण्याचं आवाहन केलं आहे.

सचिनने या उपक्रमाला शुभेच्छा देत म्हणाला आहे की, ‘हे एकूण मला फार आनंद झाला आहे की, 12 तारखेला सगळ्या पुणेकरांनी ठरवलं आहे की, हॉर्न वाजवायचा नाही. मग ती गाडी असो, बाईक असो, स्कुटर असो तुम्ही हॉर्न नसाल वाजवणार. पण मला हे ही वाटत की बाकीचे ट्राफिक नियम ही तुम्ही पाळायला हवे. फक्त हॉर्न न वाजवल्याने समस्या सुटणार नाही. हा एक चांगला प्रयत्न आहे. हॉर्न जर का कमी वाजवायचा असेल तर सर्व प्रथम तुमच्यात खूप संयम असावा लागतो. हा प्रयत्न खूपच चांगला आहे. यासाठी मी आधीच तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो, असं सचिन म्हणाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या