आंबे तोडण्याच्या आकडीवरून झालेल्या वादात डोक्यात कोयता मारला

crime

आंबे तोडण्याची आकडी घेऊन जाण्यावरून झालेल्या वादात दोघांनी एकाच्या डोक्यात कोयत्याने वार केला. ही घटना फुगेवाडी येथे घडली. शांतवण आढाव याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जतिन अवसरमल उर्फ सोन्या आणि युवराज रामदास गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 7 मे रोजी शांतवण हा आरोपी जतिन याच्या घरासमोरील आंबे तोडण्याची आकडी घेऊन निघाला होता. यावेळी जतिनने त्याला आकडी घेण्यास विरोध केला. आंबे तोडून झाल्यावर तुला पुन्हा आकडी आणून देतो, असे शांतवण म्हणाला असता त्यांच्यात वाद झाला. युवराजने त्याला पकडून ठेवले आणि जतिनने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. यात शांतवण जखमी झाला. सहायक फौजदार आर. डी. तापकीर तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या