राँग साईडने घुसणाऱ्यावर अवघ्या चार तासांत आरोपपत्र दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

राँग साईडने गाडी दामटणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांनी चांगलाच झटका दिला आहे. वाहतूक पोलिसांनी भादंवि २७९ नुसार गुन्हा दाखल करताच अवघ्या चार तासांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. बेशिस्त वाहनचालकाविरोधात हे पुण्यातील न्यायालयात दाखल झालेले पहिले आरोपपत्र आहे. अयुब बादशहा शेख (वय ३२, रा. सय्यदनगर) यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे. पोलीस कर्मचारी सुतार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाहू महाविद्यालय ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावर लक्ष्मीनगर रहिवासी  संघ हॉल ते गजानन महाराज मंदिर यादरम्यान वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीही शेख हे तेथून जात असल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर २७९ची कारवाई करून गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जगताप यांनी अवघ्या चार तासांत पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी न्यायालयाने शेख यांना एक हजार रुपयांच्या दंडाशी शिक्षा सुनावली.

वाहतूक नियोजन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, भादंवि २७९ अन्वये गुन्हे दाखल केल्यांनतर त्यांच्यावर खटले भरले जात आहेत. पहिल्या खटल्याचे दोषारोपपत्रात एका वाहनचालकाला हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.