पुणे – पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

वडील आणि मुलाची भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या बीट मार्शलला दोघांनी धक्काबुक्की केली आहे. याप्रकरणी प्रशांत नामदेव भालेराव (वय 32), सचिन पाडुरंग गायकवाड (वय 34, रा. चमन बेकरीजवळ, ताडीवाला रोड) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस शिपाई सागर जगताप यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बीटमार्शल असून शनिवारी दिवसपाळीवर कर्तव्याला होते. रात्री दहाच्या सुमारास ताडीवाला रोड परिसरात एका ठिकाणी भांडणे सुरू आहेत, असा फोन त्यांना नियंत्रण कक्षातून आला. त्यानंतर पोलिस शिपाई जगताप हे घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी प्रशांत व त्याचे वडील नामदेव यांच्यात वादावादी सुरू होती. त्यावेळी पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगितले. त्यानंतर सागर हे प्रशांतला घेउन पोलिस चौकीजवळ आले. त्यावेळी प्रशांतने मला पोलिस चौकीजवळ कशाला आणले, असे म्हणून त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस अधिक तपास करत आहेत.