अवघ्या 11 मिनीटात रिक्षाचालकाचा खेळ खल्लास; भांडणातून खून केल्याची हल्लेखोराची कबुली

1268
murder

मारहाण केल्याचा राग आणि सातत्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्रानेच अवघ्या 11 मिनीटात रिक्षाचालकाचा खून केल्याची कबुली दिली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी 30 तासांत रिक्षाचालकाच्या खूनाचा उलगडा केला आहे. प्रीतम उर्फ बाळू उर्फ पांग्या रघुनाथ मोरे (वय 36, रा. तरवडे मळा, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राहूल विनायक जगताप (वय 47, रा. कवडे वस्ती) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक राहूलला दारुचे व्यसन होते. त्यामुळे तो मित्रासह मद्यपान करून कोणालाही शिवीगाळ करीत होता. दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वा आठच्या सुमारास दारु पिताना राहूलने प्रीतमला शिवीगाळ केली. त्यामुळे प्रीतम रेल्वेपटरी ओलांडून घराच्या दिशेने आला. त्यापाठोपाठ राहूल आला. त्यानंतर राहूलने पुन्हा प्रीतमला शिवीगाळ करुन लाथ मारली. काही दिवसांपूर्वी राहूलने प्रीतमला दगड मारला होता. त्यानंतर पुन्हा लाथ मारल्यामुळे प्रीतमने राहूलवर शस्त्राने वार केला. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 2008 मध्ये प्रीतमविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके, लंके, शिंदे, साळुंंके, सावंत सोनवणे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या