
पुणे हिट अॅण्ड रन प्रकरणातील मोठी अपडेट समोर येत आहेत. पुण्याच्या हिट अॅन्ड रन प्रकरणातील मुख्य अल्पवीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला जामीन मंजूर झाला आहे. सर्वाच्च न्यायालयाने काही अटीशर्थीवर विशाल अग्रवाल याला जामीन मंजूर केला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे मे, 2024 मध्ये ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे कार भरधाव चालवत दोन बाईकस्वारांना चिरडले होते. यातील मुख्य व सहआरोपी अल्पवयीन आहेत. घटना घडली तेव्हा हे दोन्ही आरोपी दारू प्यायले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली. मुलाला वाचवण्यासाठी बांधकाम उद्योजक असलेल्या विशाल अगरवाल याने वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचे निदर्शनास आले होते. शिवाय तुरुंगात आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय बळ वापरले गेल्याचा आरोप झाला. त्यानंतर विशाल अगरवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या 22 महिन्यांपासून विशाल तुरुंगात आहे. आता विशाल अग्रवाल याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला आहे.

























































