स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे पृथ्वीराज सावरकर यांचे निधन

503

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे मार्गदर्शक पृथ्वीराज सावरकर यांचे सोमवारी कोथरूड येथे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. गेले काही महिने ते कर्करोगाने आजारी होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांचे नातू आणि विक्रम सावरकर यांचे ज्येष्ठ पुत्र होत.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे महाराष्ट्र मिलिटरी स्कूल या दोन्ही संस्थांमधून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार विविध प्रकल्प तसेच योजना कार्यान्वित करण्यात त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत तसेच जडणघडणीत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विक्रम सावरकर यांच्या हिंदू संघटन तसेच राष्ट्रहिताच्या कृतिशील कार्यातदेखील त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने एक कृतिशील कार्यकर्ता, मार्गदर्शक तसेच आधारस्तंभ गमावला आहे अशी प्रतिक्रिया स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या