पुणे – वडगाव बुद्रुकमध्ये रिक्षा चालकाची आत्महत्या

580

सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुकमध्ये एका रिक्षा चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी सव्वादोन वाजनेचे सुमारास उघडकीस आली. नंदू बेबी अंधारे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधारे हे धनकवडी येथे एकटेच वास्तव्यास होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांनी वडगाव बुद्रुक येथील मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या लॉजमधील एका पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटस्फोटनंतर त्यांचा मुलगा व मुलगी पत्नीकडे राहत होती. अंधारे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. माहीती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गिरीष धुमाळ करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या