पुण्यात शुकशुकाट…

1429

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनलॉकनंतर मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक रस्त्यांवर नेहमीप्रमाणे रहदारी सुरू झाली होती. मात्र, सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर बहुतांश रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. विनाकारण भटकंती, विनामास्क प्रवास करणाऱयांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला.

विभागीय महसूल आयुक्त क्वारंटाइन

विभागीय महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या चालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने म्हैसेकर यांना होम क्वारंटाइन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून डॉ. म्हैसेकर हे प्रत्यक्ष कामात सक्रिय आहेत.

चंद्रपूर, साताऱयात शुक्रवारपासून लॉकडाऊन

चंद्रपुरात 17 ते 20 जुलैपर्यंत आणि सातारा येथे 17 ते 22 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या दोन्ही ठिकाणी रुग्णसंख्या वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या