पुणे- सातारा रस्त्यावर अपघात, उड्डाणपुलावर वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील उड्डाणपुलावर घडली.

विकास सुरेश परदेशी (वय – 35, रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश परदेशी (वय – 26) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार विकास हे रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास धनकवडीतील शंकर महाराज उड्डाणपुलावरुन घरी निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार परदेशी यांना धडक दिली.अपघातात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करत आहेत.