
उसन्या घेतलेल्या पैशांचे व्यवहार मिटविले असतानाही टोळक्याने घरात घुसून सख्ख्या भावंडांवर वार केल्याची घटना काल सकाळी नउच्या सुमारास पुणे जिल्ह्यातल्या घोरपडीतील केस्ट्रा अपार्टमेंटमध्ये घडली.
या प्रकरणी संपत इसवे, इलीयास शेख आणि रामा यांच्याविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजेयद्र हनुमंतराव पवार (वय 32 रा. घोरपडी) यांनी तक्रार दिली आहे.
विजेयंद्र पवार यांनी संपत इसवे यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. त्यानंतर त्यांनी घेतलेली रक्कम परत देउन व्यवहार मिटविला होता. मात्र, तरीही काल सकाळी संपत इसवे आणि दोन साथीदार विजेंयद्र यांच्या घरात शिरले.
आरोपींनी त्यांच्याकडे 4 कोटी 60 लाख रूपयांची मागणी केली. त्यानंतर इलीयासने बॅगेतून हत्यार काढून विजेंयद्र यांच्यावर वार केला. त्यानंतर आरोपींनी विजेंयद्र यांच्या भावावर वार करून जखमी केले. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.
























































