शिरुर व हवेली तालुक्यात मतदार जनजागृती

43

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पुणे व “यशस्वीनी” वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर व हवेली तालुक्यात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन यशस्विनी महिला वेल्फेअर फाउंडेशनच्या शिरूर तालुका समन्वयक दिपाली शेळके यांनी केले आहे.

शिरूर व हवेली तालुक्यात राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती अभियानाला ठिकठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. वाघोलीचे बी जे.एस काँलेज, लोणीकंद पोलीस स्टेशन, कोरेगाव भीमा बाजार मैदान,सणसवाडी भैरवनाथ मंदिर, रांजणगाव गणपती देवस्थान, शिरुर कोर्ट, बाजार समिती शिरुर , मांडवगण फराटा या ठिकाणी पञके वाटुन घोषणा देत जनजागृती करण्यात आली. या वेळी पिंपरी चिंचवड स्वराज्य विश्वसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, दिपालीताई शेळके,यशस्वीनी महिला अभियानाच्या तालुका सचिव नम्रता गवारे,सामाजिक कार्यकर्ते विजय गव्हाणे,रेखा कळमकर, वंदना पोतदार,संगीता मल्लाव व अन्य उपस्थित होते. शिरूर येथे बाजार समिती आवारामध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी शिरुर शहारातील पुष्पा जाधव,शिवानी धवन,प्रमिला शिरसाट,कल्याणी गायकवाड, पायल गव्हाणे,कल्पना सामंत, निशा जगधने,निलम अवचिते,सुनिता ढवळे अन्य महिला व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. मतदारांनी मतदान करुन आपले कर्तव्य बजावल्यास मतदानाचा टक्का वाढण्यास नक्कीच मदत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या